Breaking News

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल



        Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana महाराष्ट्र सरकार द्वारे राज्यातील गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध करून दिला जातो त्यामध्ये आता नवीनच मोठा बदल करून मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध करण्याकरिता सोपी पद्धत चालू करण्यात आली आहे.

        राज्यातील गरीब रुग्णांना मोठ्या आजारावर उपचार घेण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी योजना चालू करण्यात आलेली आहे ही योजना राज्यातील गरीब रुग्णांसाठी म्हणजेच जे रुग्ण बऱ्याच मोठ्या आजारामध्ये दवाखान्यामध्ये जाऊन उपचार घेऊ शकत नाही अशा गुणांसाठी शासनाकडून औषध उपचाराच्या आणि रुग्णांना दवाखान्यामध्ये जाऊन ऑपरेशनच्या खर्चासाठी शासनाकडून काही प्रमाणात मदत दिली जाते परंतु या योजनेमध्ये आतापर्यंत गोरगरीब रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध करण्यासाठी बऱ्याच अडचणी निर्माण होत होत्या किंवा काही रुग्णांना तर मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध करण्यासाठी असणारी प्रक्रिया न समजल्यामुळे हा निधी उपलब्ध होत नव्हता किंवा या निधीपासून तो रुग्णांना वंचित राहत होता पर्यायाने त्या रुग्णाला निधी उपलब्ध न झाल्यामुळे योग्य उपचार मिळत नव्हते.

        Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana परंतु रुग्णांची हीच अडचण ओळखून सरकारने मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये बदल करून मुख्यमंत्री सहायता निधी लवकरात लवकर रुग्णांना कशाप्रकारे उपलब्ध होईल यावर विचार करून सरकारने मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध करण्यासाठी रुग्णांना ज्या काही अडचणी येत होत्या त्यामध्ये मोठा बदल करून हा निधी रुग्णांना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याकरिता चांगल्या प्रकारच्या तरतुदी केल्या आहेत.

        म्हणजेच मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध करण्याकरिता आवश्यक असलेल्या प्रक्रिया अधिक सोप्या केल्या आहेत आता मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध करण्याकरिता 8650567567 या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर लगेचच आपल्या मोबाईलवर मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठीच्या अर्जाची लिंक उपलब्ध होईल ही लिंक उपलब्ध झाल्यानंतर लिंक द्वारे आवश्यक कागदपत्रासह अर्ज भरून पूर्ण करायचा आहे त्यामुळे रुग्णांची किंवा रुग्णांच्या नातेवाईकांची मुख्यमंत्री सहायता निधीसाठी होणारी धावपळ कमी होणार आहे किंवा जवळपास संपणार आहे.

        Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या लोकांना मोठ्या आजारावर उपचार घेणे शक्य होत नाही त्यासाठी राज्य सरकारने गरीब आणि गरजूवंत रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे मदत दिली जाते किंवा मदत केली जाते. त्यामध्ये विविध शस्त्रक्रिया व आजारावरील उपचाराची मदत दिली जाते. नाही मदत मिळवायची असेल तर सर्वात आधी अर्ज कुठे मिळणारे तपासून सुरुवात होते किंवा अर्ज कसा करायचा आणि कोणाकडे करायचा हेही माहित नसते.

        रुग्णांना रुग्णालयातूनच मदत मिळाली तर रुग्णांना धावपळ करण्याची गरज पडत नाही काही योजनेमध्ये रुग्णांना रुग्णालयातूनच मदत मिळते परंतु मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्याकरिता रुग्णांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागत होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना होत होता हाच त्रास आणि धावफळ कमी करण्यासाठी आता राज्य सरकारने मुख्यमंत्री सहायता निधी या योजनेमध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा केली आहे आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने नवा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे रुग्णांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना निधी उपलब्ध करण्यासाठी मिस्ड कॉल ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

        मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी आता फक्त एक मिस्ड कॉल दिल्यानंतर लगेचच त्या मोबाईलवर अर्जाची लिंक एसएमएस द्वारे उपलब्ध होईल त्या लिंक वर ऑनलाईन अर्ज डाऊनलोड करता येईल या अर्जाची प्रिंट काढून तो अर्ज व्यवस्थित रित्या भरून मागवण्यात येणाऱ्या सर्व कागदपत्रासह पोस्टद्वारे किंवा अर्ज स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात संबंधित विभागाच्या मेल आयडीवर मेलद्वारे पाठवण्यात यावा. हा अर्ज संबंधित विभागाला मिळाल्यानंतर लगेचच तुमच्या अर्जाची किंवा अर्जावर योग्य ती कारवाही करून लवकरात लवकर मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध होईल.

        Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी कॅन्सर, हृदय विकार, अपघात, गुडघा प्रत्यारोपण, खुबा प्रत्यारोपण, डायलिसिस, किडनी विकार यासारख्या मोठ्या आजारावर मदत मिळण्यासाठी अर्ज केले जातात व याच आजारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी मधून मदत केली जाते.

        राज्यातील गरजूवंत व गरीब रुग्णांना मदत मिळण्यासाठी किंवा मदत मिळण्याकरिता होणाऱ्या अडचणी कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने हा नवा उपक्रम चालू केला आहे. यामुळे गरजू रुग्णांना अडचणीच्या काळामध्ये सहजरीत्या आर्थिक मदत मिळण्यासाठी मदत होईल.

No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...